लॉकडाऊनमुळे आणि करोनाच्या भीतीमुळे जीवाच्या आकांताने आपल्या घरी परतणाऱ्या स्थलांतरित मजुरांची एक अप्रतिम कैफिएत
तुम्हाला मोह पडलाय, सोडून जाताना दु:ख होतंय. असं होऊ शकतं! पण याचा अर्थ असा नाही की, तुम्ही तुमच्या हातांनी जे काही उभं कराल, ते सगळं तुमच्या मालकीचं होईल. या न्यायानं तर हे सगळं जगच तुमच्या मालकीचं झालं असतं, मग आम्ही मालकलोक कुठे गेलो असतो! लक्षात असू द्या, मालक, मालक असतो, मजूर, मजूर!.......